मुंबई - भारतीय जनता पक्ष हा ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित यावेळी त्यांनी भाजपात घराणेशाहीला तारा नाही असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे. घराणेशाहीची भाजपची अशी बरीच मोठी यादी सांगता येईल, भाजपचे ८७ आमदार घराणेशाहीशी संबंधित आहेत, अशा त्या म्हणाल्या.
आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील-निलंगेकर, मंत्री रामप्रसाद बोर्डीकर यांची कन्या मेघना बोर्डीकर, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे, मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आकाश फुंडकर, इतकंच काय तर आ. गंगाधरराव फडणवीस यांचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. घराणेशाहीची भाजपची अशी बरीच मोठी यादी सांगता येईल अशा त्या म्हणाल्या तसेच मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात निवडून आलेल्या भाजपच्या १३२ आमदारांपैकी ८७ आमदार घराणेशाहीशी संबंधित आहेत. म्हणजे भाजप विधिमंडळ पक्षात जवळपास ७५ टक्के घराणेशाही आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात इतकी घराणेशाही आहे की त्याला मंत्रीमंडळ म्हणावे की Family Owned Business हा प्रश्न आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य तितकेच खरे आहे जितके हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत, महिलांना २१०० रु देण्याबाबत बोलले होते... Party with difference म्हणजे भाजप, बोलायचे एक आणि करायचे एक असं त्या शेवटी म्हणाल्या.
No comments:
Post a Comment